शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०२३

वाराणसी

#वाराणसी
वाराणसी भाग ३
    अयोध्या, प्रयागराज पाहून आम्ही परत वाराणसीला आलो. थोड्या विश्रांती नंतर संध्याकाळी एक रिक्षा ठरवून राहिलेली ठिकाणं पाहायला सुरवात केली. तुफान गर्दीत काळभैरवाचे दर्शन घेतले. मंदिरात फार सुंदर हिम आरास केली होती. काशीची रक्षक देवता. काशीचा क्षेत्रपाल म्हणून महादेवांनी यांची नियुक्ती केली होती.
      थोडीफार खरेदी आणि पोटपूजा करून थेट अस्सी घाटावर गेलो. गंगेचा पूर थोडा ओसरला होता त्यामुळे  गंगा आरती सर्वांसाठी खुली ठेवली होती. फार सुंदर अनुभव होता. एकदम अविस्मरणीय. 
    रम्य संध्याकाळी  घाटाच्या पायऱ्यांवर बसलेले भाविक. अस्ताला जाता जाता समस्त काशीला तेजोमय करणारा तेजोगोल. क्षितिजावर पसरलेले श्यामरंग. भाविकांनी भक्तिभावाने गंगेच्या प्रवाहात अर्पण केलेले दिवे. तिच्या लाटांवर आनंदाने डोलणाऱ्या ज्योती. त्यांच्या सात्विक तेजाने नटलेली आणि त्या आनंदाने दुथडी भरून वाहणारी गंगामैय्या. पुरोहितांनी दीपमाळांनी ओवाळत तालासुरात गायलेली आरती. अशा भक्तिमय , शिवमय  वातावरणात सर्वांनी भारावून जाऊन एकमुखाने केलेला गंगा मैय्याचा आणि विश्वेश्वराचा जयघोष.
 जय भोलेनाथ! जय गंगा मैय्या!
     गंगा आरती पाहण्याचा दोनदा योग आला. एकदा काठावर बसून आरतीत सहभागी झालो. अणि दुसऱ्यांदा अलकनंदा cruise मधून. तोही अनुभव खूपच छान होता. Cruise मधून ८४ घाटांचे दर्शन होते. अस्सी घाट, जैन घाट, गंगा घाट, दशाश्वमेध घाट , इथली गंगा आरती सर्वात प्रसिद्ध, सिंधिया घाट, केदार घाट,काही घाटांचे पौराणिक दृष्टीने खूप महत्व आहे... 
हरिश्चंद्र घाट ...सत्यवादी रघुवंशी राजा हरिश्चंद्राने या ठिकाणी   हरिश्चंद्रेश्वर शिवलिंगाची स्थापना केली. राजा हरिश्चंद्र, माता तारामती, आणि रोहीताश्व यांचे खूप पुरातन मंदिर ही आहे. ऋषी विश्वामित्रांनी राजाची सत्वपरीक्षा घेतली तेव्हा याच ठिकाणी राजाने स्वतःला इथल्या स्मशानभूमीच्या चांडाळाला,  डोमला विकले होते. राजा ला विकत घेतले म्हणून त्यांना लोक राजा डोम म्हणू लागले. 
     मणिकर्णिका घाट...जन्म.. जीवन.. मरण...याच चक्राची अंतिम सत्याची जाणीव करून देणारा हा घाट. रात्रंदिवस इथे या महास्माशनात अंत्यसंस्कार चालू असतात. पहिला अग्नी शंकरांनी च इथे लावला होता. येथील अग्नी कधी शांत होत नाही असे म्हणतात. सतीचे कर्ण कुंडल इथे पडले होते. यावरून नाव मणिकर्णिका घाट पडले.
     राजा डोमच्या पूर्वजांना सतीचे कर्ण कुंडल सापडले असून ते सापडले नाहीत असं खोटं सांगितल्यामुळे  शंकरांनी चिडून त्यांना कायम स्मशानभूमीत च काम करण्याचा, अंत्यसंस्कार करण्याचा शाप दिला आहे. तर पश्चाताप होऊन राजा डोम ने माफी मागितल्यावर यांच्या हस्ते जेव्हा शवाचे अंत्यसंस्कार होतील तेव्हा त्या मृतात्म्याला मोक्ष प्राप्ती होईल असे वरदानही नंतर शंकरांनी यांना दिले आहे. आणि अजूनही ती परंपरा वर्षानुवर्षे इथे चालू आहे. चितेवर पहिली पाच लाकडे ही राजा डोमवंशज च रचतात आणि अग्नी देतात. शाप की वरदान???आपल्यासारख्या सामान्यांसाठी सर्वच अनाकलनीय....
     पंचगंगा घाट...पंच माधवां पैकी बिंदु माधव मंदिर इथे आहे. अत्यंत सुंदर, तेजस्वी अशी गंडकी पाषाण मूर्ती आहे ही. प्राचीन शाळिग्राम ही इथे पाहायला मिळतो. इथले पुजारी मराठी आहेत. त्यांनी खूप छान माहिती दिली.(बिंदु माधव , काशी...,वेणी माधव, प्रयागराज..., पिठापुरम् कुंतीमधव...,सेतू माधव , रामेश्वरम्...आणि सुंदर माधव तिरुवनंतपुरम् ) (बिंदुमाधव याची माहिती पहिल्या लेखात ही लिहिली आहे.) 
पंचगंगा घाटापसून परत माघारी राजघाट, अस्सी घाटाकडे जाताना प्रत्येक घाटाची महत्वाच्या मंदिरांची माहिती ते सांगत होते. साथीला सुमधुर वाद्यसंगिताची आणि कडक चहा ची जोड होती. प्रत्येक घाट रंगीबेरंगी लखलखीत दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाला होता. गंगेच्या पात्रातून गंगा आरती चा सोहळा पाहताना आम्ही मंत्रमुग्ध होऊन गेलो.  
        बाकीची पाहिलेली मंदिरे... बटुक भैरव, प्रत्येक शक्तीपीठा जवळ एक भैरव मंदिर असते. हा बटुक भैरव देवी कामाख्या मंदिरा जवळ आहे. कामाख्या देवी मंदिर, दुर्गा माता, संकटमोचन हनुमान मंदिर, तुलसी मानस मंदिर, कवडीमाता मंदिर, सारनाथ , BHU (Banaras Hindu University)... मस्त आहे एकदम , BHU विश्वनाथ मंदिर, liabrary, museum पहायची फार इच्छा होती. पण बंद होती. 
     परतीच्या प्रवासाला निघण्यापूर्वी पुन्हा एकदा काशी विश्वेश्वर दर्शन , कॉरिडॉर, घाट पाहण्यासाठी पहाटे गेलो. अधून मधून पाऊस पडत होता त्यामुळे दर्शन मार्गात सगळीकडे आणि मंदिराच्या कळसाला लागून ही एक मांडव घातला होता. भरपूर माकडं तिथे उड्या मारत प्रसाद खायला येत होती. आम्ही दर्शन घ्यायला तिथे पोहचलो. त्रिवेणी संगमाचे तीर्थ आणि शरयू तीर्थ जल काशी विश्वेश्वराच्या पिंडीवर अर्पण करायला गेलो आणि नेमक्या त्याच क्षणी माकडांनी मांडवावर अशी काही ऊडी मारली की त्यावरचे साचलेले सगळं, बादल्या दोन बादल्या पाणी डायरेक्ट माझ्या डोक्यावर  😄. गंगा स्नानाची ईच्छाही अशा तऱ्हेने पूर्ण झाली.😄

     आमची हॉटेल मधून chek out ची वेळ झाली. त्यांचा एक staff member चेकिंग साठी आणि रेकॉर्ड घेण्यासाठी डायरी घेऊन आला होता. येताना जेवढ्या लोकांनी check in केलं होतं, जातानाही तेवढेच लोक chekout करत आहेत ना हे चेक करायला तो आला होता. मी कुतूहलापोटी न राहवून विचारले, "जितने आए थे, उतनेही लोग वापस  जायेंगे ना? 
तो म्हणाला, " यह काशी है दीदी... श्रावण मास भी चल रहा है और कावड यात्रा भी|  बहोत से लोग यहाँ गंगा जी में ही मिल जाने के लिये भी आते है, इसलिये ऐसा चेक करना पडता है|"
मी ... निःशब्द...सुन्न!!

असं म्हणतात, काशीत शिव शंकर वास करतात...मला तर इथे ही संपूर्ण काशीच त्या भोळ्या शंभूमहादेवात सामावलेली आहे असा प्रत्यय आला.

सौ. श्वेता अनुप साठये✍️

आधीच्या लेखाच्या लिंक
https://m.facebook.com/story.php?story_fbid=7843011025770341&id=100001845644514&mibextid=Nif5oz

https://m.facebook.com/story.php?story_fbid=7854105441327566&id=100001845644514&mibextid=Nif5oz

गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०२३