नर्मदे हर 🙏🏻😇
जय श्री महाकाल 🙏🏻😇
इंदौर
उज्जैनहून आम्ही सकाळी इंदौर ला आलो. आधीही एकदा आलो होतो तेव्हा बीजासन माता मंदिर, पितृ पर्वत ,अन्नपूर्णा मंदिर , लाल बाग पॅलेस असं थोडं फार पाहिले होते. ह्यावेळेस पुन्हा त्यात वेळ न घालवता जे राहिले होते ते पाहिले. दिवसभर फिरण्यासाठी एक ऑटो बुक केली.
खजराना गणेश मंदिर ...मस्त मंदिर आहे एकदम. सह परिवार गणपती मूर्ती इथे पाहायला मिळते. मंदिर परिसरात अजून ही बाकीची मंदिरं आहेत. दुर्गा कलाशाच्या आकाराच्या मंदिरात, सर्व शृंगार केलेली देवी , देवीच्या हातांवर मेहंदी काढलेली बघून मजा वाटली. 💕 राम मंदिर, काळभैरव , शनी, नवग्रह अशी बरीच मंदिरे तिथे आहेत.
काच मंदिर...जैन मंदिर आहे. काचेचे तुकडे आरसे वापरून सगळीकडे नक्षीकाम केले आहे. खूप सुंदर आहे. फोटो काढायची परवानगी नव्हती.
राजवाडा... मल्हारराव होळकरांचा ऐतिहासिक वाडा. वाडा खूप छान आहे पाहायला. आत संग्रहालय आहे. देवी अहिल्या बाईंचा जीवन प्रवास दाखवणारे देखावे आहेत. पालखी , त्यांनी वापरलेल्या, वस्तू, त्यांचा देव्हारा असं सगळं इथे पाहायला मिळते.
लोटस व्हॅली... इंदौर पासून वीस किलोमीटर वर एका खेडेगावात बरेच छोटे तलाव दिसतात. तिथे सगळीकडे कमळ पाहायला मिळतात. सगळे तलाव कमळानी भरलेले होते. बोटिंग करता येते. बरेच फोटो शूट इथे चालू होते. खूप सुंदर आहे.
वैष्णोदेवी माता मंदिर...वैष्णोदेवी ची प्रतिकृती इथे बनवली आहे.
बडा गणपती मंदिर असं सगळं पाहून छप्पन दुकान मधून तिथले प्रसिद्ध तीळगुळाचे गजक घेऊन आम्ही संपूर्ण प्रवासाच्या मस्त आठवणी घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो.
नर्मदे हर 🙏🏻😇
जय श्री महाकाल 🙏🏻😇
सौ श्वेता अनुप साठये✍🏻
१०/१/२०२५
शुक्रवार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा