शनिवार, ७ सप्टेंबर, २०१९

बोडण


"बोडण"
२० वर्षांपूर्वी माझं लग्न होऊन मी सासरी आले आणि कोकणस्थांच्यात केला जाणाऱ्या एका छान कुलाचाराची मला ओळख झाली. 😊 "बोडण"
शुभ कार्या नंतर घरामधे केला जाणारा कुलाचार.
देवाचं करण्याची मुळातच मला लहानपणापासून आवड .
त्यामुळे थोडे अवघड वाटले तरी खूप मनापासून केले जाते आणि त्यामुळे घरात " बोडण" झाले की मला खूप समाधान आणि मनःशांती मिळते. प्रसन्न वाटते.
परवाच एका कार्याचं "बोडण" मी घरी केले.
चार सवाष्णी आणि एक कुमारीका अशा पाच जणींनी मिळून परातीमधे अन्नपूर्णेची पूजा करून त्यामधे महानैवेद्य कालवायचा. कुमारीका जे मागेल ते पंचामृत वरुन दूध, तूप, मध,साखर,दही परातीत घातले जाते. कुमारीकेचा मान असतो. 😊
नंतर सर्वांनी मिळून सहभोजन घ्यावे.
सौ.श्वेता अनुप साठये ✍️








३ टिप्पण्या:

  1. सुंदर! बोडणाची म्हणून एक पारंपरिक रांगोळी असते गं ..लहानपणी त्यासाठी नाक टोचलेलं आणि खणाचा परकर पोलका शिवलेला! त्यादिवशी करवलीचा काय मान असे गंम्मत वाटायची सगळी..वडे घारगे नैवेद्याला.. आठवणी जाग्या झाल्या.

    उत्तर द्याहटवा