मंगळवार, ३ सप्टेंबर, २०१९

श्रीगणेशा

   


                                                




  कृष्णा कोयनेच्या  कुशीत वसलेल्या छोट्याशा गावचा माझा जन्म. निसर्गाच्या वैभवाने नटलेलं, सांस्कृतिक आणि पौराणिक वारसा लाभलेलं असं माझं गाव. त्यामुळेच  निसर्गाच्या सानिध्यात, चित्रकलेत आणि आई आणि आजी कडून वारसाने आलेल्या पाककलेत मी रमून जाते.
     लेखनाच्या बाबतीत म्हणाल तर लहानपणी नातेवाईकांना घरातील वडीलधारी मंडळी सांगतील त्याप्रमाणे शुभेच्छांची आणि खुशालीची पोस्टकार्ड लिहीण्या इतपतच माझी काय ती मजल होती. बाकी शाळाकॉलेजात असताना अभ्यासक्रमात असलेले निबंध लिहिले असतील तेवढेच काय ते. लग्नानंतर मी अभिमानाने गृहिणीपद भूषवते आहे. 
     प्रापंचिक जबाबदऱ्यांमधून थोडीशी उसंत मिळाल्यावर जरा भीत भीत च फेसबुक अकाउंट काढणारी मी आणि सुरवातीला नुसत्या इतरांच्या पोस्ट ना लाईक्स आणि कंमेंट्स देणारी मी हळूहळू  अगदी सराईतपणे social मीडियावर वावरू लागले. हाती घेतलेलं हे व्रत सोडून देणं म्हणजे केवळ अशक्य.😀  " तू ही लिहू शकतेस, लिहीत जा ", असे कौतुक करून आत्मविश्वास मिळवून देणारे मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यामुळे  चक्क छोटे छोटे लेख लिहिण्या पर्यंत अगदी आता मी मजल मारली आहे. सर्वांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादामुळे आणि प्रोत्साहनामुळेच मला हे साध्य होत आहे. या सर्वांच्या आणि हो ,माझ्या लेखांवर मिळणाऱ्या लाईक्स आणि कंमेंट्स पाहून माझ्यापेक्षाही जास्त खूश होणाऱ्या माझ्या नवऱ्याच्या प्रेमळ आग्रहाचा मान राखून "अनुश्वेत" हा ब्लॉग काढण्याचा मानस केला.

    नेहमीप्रमाणेच आताही माझ्या ह्या ब्लॉग काढण्याच्या पहिल्यावहिल्या प्रयत्नाचे यश हे तुम्ही दिलेल्या प्रतिसादातच आहे. 

चला तर मग माझ्यासवे "अनुश्वेत" च्या सफरीवरी

करीन म्हणते सादर इथुनी , काही आठवणीतले मोती आणिक चटपटीत गोड पाककृती

जोड असेल तयास माझ्या रंगबिरंगी चित्रांची

मनास भावे ते ते, लेखणीतूनी सादर करेन "अनुश्वेती"

सौ. श्वेता अनुप साठये

१२ टिप्पण्या:

  1. सुंदर सुरूवात... 👌🏻👌🏻
    पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा... 👍🏻👍🏻👍🏻

    उत्तर द्याहटवा
  2. Khupach sunder shabda rachna ..ek ek shabda n artha ...surekh explain kelay ...chan anushet👌
    Asech sunder hun atisunder lekh lihi ..👍 manapasun hardik shubhechha

    उत्तर द्याहटवा
  3. Khupach sunder shabda rachna ..ek ek shabda n artha ...surekh explain kelay ...chan anushet👌
    Asech sunder hun atisunder lekh lihi ..👍 manapasun hardik shubhechha

    उत्तर द्याहटवा
  4. नवनवीन पककृतींचा नजराणा
    त्यासोबत गद्य पद्य सुमधुर रचना
    लवकर लिही गं काय ते...
    आता धीर मला धरवेना!☺️
    खूप खूप शुभेच्छा!

    उत्तर द्याहटवा
  5. खूप छान लेखन आहे... तुझे श्वेता...
    तुझ्या कडून असेच अनेक छान छान लेख वाचायला मिळतील....
    खूप खूप शुभेच्छा.....


    उत्तर द्याहटवा