गोंदवले,औंध,चाफळ एक दिवस आईसोबत ❤️
बऱ्याच वर्षांनी ही यात्रा घडली. जवळ जवळ ३५वर्षांनी. फक्त मी आणि आई...दोघीच...सध्या कुठेही गर्दी नाही. गोंदवले आहे तसेच...स्वच्छता,शांतता,सात्विकता ,शिस्त याचा पावलोपावली प्रत्यय. सुंदर, प्रसन्न वातावरणात ऊन पावसाच्या खेळात विलोभनीय सृष्टी सौंदर्याचा आनंद घेत केलेला प्रवास...गोशाळा भेट...गाई वासरां च्या सान्निध्यात मस्त थोडा वेळ घालवला.
सात्विक प्रसादग्रहण...आज एकादशीच्या फराळाचा बेत...भक्तिमय वातावरण.
औंध च्या यमाईचे ही दर्शन घेतले. यमाईच्या डोंगरावरून दिसणारे सृष्टीसौंदर्य , ऊनपावसाच्या खेळात रंगलेला निसर्ग पाहत नुसते दोघी शांत बसून राहिलो, वाऱ्याबरोबर येणारा मातीचा गंध अनुभवत.
चाफळ राममंदिर निसर्गाच्या कुशीत, शांत वातावरणात ...मंदिर आवारात असलेली सोनचाफ्याची आठदहा झाडं पाहून मिळालेला आनंद . श्रीराम लक्ष्मण सीते च्या सुबक सुंदर मूर्तींचे दर्शन घेऊन आईने आपणहून आर्त स्वरात म्हंटलेले भजन ...पूर्वी खूप गायची...आता क्वचित...तिच्या नकळत व्हिडिओ काढला ...सोबत शेअर करते.
एकंदरीत यात्रा छान झाली...दिवस सार्थकी लागला.
||श्रीराम जय राम जय जय राम||🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा